- तहसीलदार आणि पाणी पुरवठा अधिकारी यांच्या आश्वासनानंतर चार तासांनी आंदोलन मागे
- आजच पाच वाजता वीज कनेक्शन जोडणार
प्रभाकर गारे त्रंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्ष या ग्रामपंचायत मध्ये जलस्वराज्य योजनेचे नळ पाणी पुरवठा योजना असून ती गेले दोन वर्षापासून बंद आहे ग्रामपंचायत ने विज बिल दाखवल्याने सदर योजनेचे वीज कनेक्शन वीज कंपनीकडून तोडण्यात आले तेव्हापासून सदर योजना बंद अवस्थेमध्ये आहे त्यानंतर त्याच गावात 2023 पासून जलजीवन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू झाले आहे मात्र ते काम अर्धवट आहे त्यामुळे दोन दोन योजना असून देखील या गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही याबाबात अनेकदा पत्रव्यवहार करूनही काहीच उपाय योजना केली नाही
दोन दोन योजना आणि त्याही कोटी रुपयांच्या द योजना असताना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे
म्हणुन एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने त्र्यंबक तालुक्यातील टाकेहर्ष गावातील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार आहे.
2022/23पासून जल जीवन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे यासाठी कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली मात्र ते काम अद्यापही अपूर्णच आहे या योजनेचे काम सुरू केले त्याच्या आधी पासून गावात जलस्वराज्य योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना होती होती मात्र वीज बिल थकल्याने तिचे वीज कनेक्शन बंद करून टाकले होते तेव्हा पासून जुनी योजना देखील बंद होती.
गावाला गेल्या वर्षभरापासून पिण्यासाठी पाणी मिळत नाही
जल जीवन योजना 2023 आली काम 40 टके काम झालेल आहे
अर्धवट काम केलेलं आहे त्यामुळे
पाण्यासाठी महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे पिण्यासाठी पाणी मिळत नाही महिला आज एका खाजगी विहिरीवर जाऊन मोठी कसरतदे करून पाणी भरत आहेत.
ग्राम पंचायत प्रशासन आणि आपल्या पाणी पुरवठा विभाग काहीही करत नाही म्हणून आज एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने त्र्यंबक देवगाव रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले सकाळी 11वाजे पासून टाकेहर्ष येथील शेकडो महिला एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रिकामे हांडे घेऊन शेकडो महिला त्र्यंबक देवगाव रस्त्यावर रस्ता रणरणत्या उन्हात चार तास बसून होत्या एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने केलेल्या आजच्या रास्ता रोको आंदोलनमुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती
- मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणाच्या कडेला असलेल्या टाकेहर्ष अशी या गावाला गेल्या वर्षभरापासून पिण्यासाठी पाणी मिळत नाही महिलाना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे पिण्यासाठी योजनेच्या वर कोटीच्या कोटी रुपयांची उधळ पट्टी केली जाते मात्र आजही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही यासारखे दुर्दैव नाही आजच्या आंदोलनाला तालुका अध्यक्ष वसंत इरते,काळू निरगुडे,सुरखा मधे , समाधान सदगीर,तुषार देहाडे,संजय पारधी,हनुमंत सराई,दत्तू बांगारे,राजू पालवे, शांताराम पादीर,निवृत्ती जाधव,देवराम होले,भारत सोनवणे,शरद पालवे संगीता पिंगळे,अशा सदगिर,स्वाती सदगीर ,आशाताई पालवे, सीता सदगिर,मीराबाई पालवे, अदी उपस्थित होते


Discussion about this post