माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे राज्यव्यापी अधिवेशन हजारो माहिती अधिकार कार्यकर्ते राळेगणसिद्धी येथे एकटवणार
माहिती अधिकार कार्यकर्ता शरद नामदेव पवार
पुणे. माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन ही महाराष्ट्रातील जागरूक नागरिकांची व माहिती अधिकार कार्यकर्त्यांची एकमेव मोठी संघटना असून संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशन दी 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राळेगणसिद्धी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथे आयोजित केले असून या अधिवेशनासाठी राज्यभरातून 500 कार्यकर्ते उपस्थित राहील असा विश्वास माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी व्यक्त केला आहे.
राळेगणसिद्धी हे माननीय अण्णा हजारे यांचे गाव असून माननीय अण्णा हजारे यांची माहिती अधिकार कायद्याचे जनक म्हणून असलेले योगदान पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे राळेगण सिद्धी हे या जागरूक नागरिक व माहिती अधिकारी यांचे पंढरी असून या विभागातून सुमारे 500 कार्यकर्ते एकत्र येणार आहे या अधिवेशनात कार्यकर्त्यांना माननीय अण्णा हजारे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन होणार आहे तसेच माहिती अधिकार क्षेत्रातील तज्ञ माननीय विवेक बेलकर यशदा प्रशिक्षण संस्थेमधील माहिती अधिकार केंद्राचे संयोजक व संबोधक अधिकारी माननीय दादू पुळे तसेच यशदाच्या माहिती अधिकार प्रशिक्षिका रेखा साळुंखे यांचे उपस्थित कार्यकर्त्यांना अमुल्य मार्गदर्शन लाभणार आहे.
शासन व प्रशासन पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त असावे व त्यात नागरिकांचा सहभाग असावा या हेतूने अण्णा हजारे अन्य समाजदूरीनांच्या आवरीत संघर्षानंतर माहिती अधिकार अधिनियम 2004 झाली अस्तित्वात आला आहे मात्र गेल्या काही वर्षात हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर खूपच अनावस्था असल्याचे दिसून येत आहे हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी यात सहभागी होणे व कायद्याच्या सामान्य नागरिकांपर्यंत प्रचार प्रसार होणे ही काळाची गरज आहे.
नागरिकांचा मोठा दबाव गट तयार झाला तरच माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीतील दोषी कमी होतील यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनची आवरीत प्रयत्न चालूच आहे यासाठी माहिती अधिकार जागरूक नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे असे आव्हान माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेश्वर आणि शेखर कोलते कार्याध्यक्ष महाराष्ट्र यांनी केली आहे
Discussion about this post