मेहकर तालुका प्रतिनिधी, सुबोध आखाडेडोणगांव – . या सर्व प्रकाराकडे कडे महसूल विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रशासन चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची प्रणाली वापरत असल्याची चर्चा परिसरात होत आहे.डोणगांव येथे अवैध गौण खनिज माफियांचा बोल बाला वाढला असून, अवैध गौण खनिज उत्खनन अन् वाहतूक करून पैसे कमवण्याची लालसा मोठ्या प्रमाणात वाढली आहे ज्यामुळे नवखे ट्रॅक्टर ड्रायव्हर जेसीबी मालक शासकीय जमिनी तसेच डोणगाव जवळील समृद्धी महामार्ग शेजारी घातलेला भराव या गौण खनिजाचे उत्खनन करून सकाळी तसेच रात्री वाहतूक करत असल्याचे दिसत आहे.
समृद्धी महामार्गालागत असलेल्या खड्ड्यातून तसेच रस्त्यालगत लावल्या भरावाला उत्खनन करुन आणला जात असताना सुद्धा महसूल अधिकारी, कर्मचारी कारवाई करीत नाहीत, हे विशेष. समृद्धी महामार्गाचा असाही उपयोग काहीजण करत आहेत महामार्गाला घातल्या भरावातून तसेच समृध्दी महामार्गाच्या हद्दीतून सुध्दा मुरूमाचे उत्खनन सर्रासपणे चालू आहे. महामार्गालगत शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पांदण रस्ते तसेच शेतरस्त्यांचा उपयोग करून महामार्गाला घातलेल्या भरावातून जेसीबी लावून मुरूम आणण्याचा प्रकार या ठिकाणी होत आहे
इथून मुरुम नेण्यासाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही तसेच रॉयल्टी सुध्दा भरण्याची आवश्यकता भासत नसल्याने गौण खनिज माफियांची मोठी टोळी या परिसरात कार्यरत आहे. परीसरात काही ठिकाणी नावाला रॉयल्टी भरली जाते. रॉयल्टी भरलेल्या गौण खनिजाच्या कित्येक जादा पटीने उत्खनन होत असताना सुद्धा दिसत आहे. कारण रॉयल्टी भरलेल्या जागेवर साधी पाहणी केली जात नाही. यामागे महसूल विभाग कोणते हितसंबंध जोपासत आहे, हे अनाकलनीय आहे. हेच नव्हे तर अवैध गौण खनिज वाहतूक करणार्या वाहनांमुळे परिसरातील रस्त्यांचे नुकसान होत आहे.
ओव्हरलोड आणि सुसाट चालणारी वाहने नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. तसेच वाहनांवर नंबर नसल्याने अपघात झाल्यास वाहन ओळखणे कठीण होते तर डोणगांव परीसरात अवैध खनिज वाहतूक करणाऱ्या मध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असून गट-तट पडलेले आहेत.डोणगांव परिसरात सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खननाला अधिकार्यांचा आशीर्वादअसून, त्याला आर्थिक लागेबांध्याची किनार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.(मेहकर उपविभाग डोणगाव परिसरात महिन्यातून किंवा दोनदा रेती व मुरुमाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एखाद्या वाहनावर कारवाई करून डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये लावत असते मात्र कडक उपाय योजना राबवून कारवाई करत नसल्याने मोठ्या ठेकेदाराला अभय देत असल्याचा प्रकार महसूल विभागाकडून होत आहे त्यामुळे महसूल विभाग फक्त आपण असल्याचे दाखवण्यासाठीच कारवाई करतो की काय असा प्रश्नही निर्माण झाल्याची चर्चा आहे.)
Discussion about this post