
(ता. प्र ) शेख मोईन.
किनवट- ख्रिसम
सच्या पार्श्वभूमीवर किनवट तालुक्यातील जवळपास ४०० ते ५०० गोरगरीब आदिवासींना वेगवेगळी आमिषे देत त्यांचे धर्मांतर करण्याचा डाव बुधवार, दि.१८ रोजी किनवटमधील सकल हिंदुत्ववादी संघटनांनी उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी मिशनरींच्या ५ जणांना ताब्यात घेवून गुन्हे दाखल केले आहेत.
किनवट-नांदेडरस्त्यावरील एन. के. गार्डनमध्ये ख्रिश्चन धर्माच्या काही लोकांनी किनवट तालुक्याच्या विविध
तीव
वाद
गावांतील ४०० ते ५०० लोकांना वेगवेगळी आमिषे देत त्यांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर करण्यासाठी एकत्र केले होते. ही बाब स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना
समजताच एक मोठा जमाव एन. के. गार्डनकडे रवाना झाला. पदाधिकाऱ्यांनी हिंदुंचे बळजबरी धर्मांतर होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.
शिवाय याविरोधात किनवट भेटीवर आलेल्या नवी दिल्लीच्या जनजाती आयोगाचे अध्यक्ष तसेच स्थानिक पोलिसांनाही सकल हिंदु संघटनांनी दिले. सकल हिंदु संघटनांचा आक्रमक पवित्रा पाहन मि शनरींना कार्यक्रम थांबवावा लागला.
दरम्यान याप्रकरणी पोलीस जमादार दिगांबर लखुळे यांनी एन. के. गार्डनमध्ये ख्रिस्ती लोक विनापरवानगी लोकांना एकत्र करून प्रार्थना घेत असल्याची ङ्गिर्याद पोलिसांत दिली. त्यावरून पोलिसांनी
धर्मगुरू कालेब उडकुडा आत्राम रा. गोकुंदा किनवट, राजेंद्र पद्माकर, प्रवीण बबनराव पाटणकर दोघेही रा. यवतम निवेदनाळ, सायन्ना चन्नया दलू रा. आडेल्ली, जि. निर्मल तेलंगणा व आनंद आनंदराव मदिरा रा. निर्मल तेलंगणा यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम ाच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. अधिक चौकशी पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला यांच्या मार्गदर्शनात फौजदार सागर झाडे करीत आहेत..
Discussion about this post