
नाशिक जिल्हा प्रतिनिधी :-
चांदवड तालुक्यातील दहीवद येथील कोमल केशव वाघमोडे ( वय १९ वर्ष ) हि आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास विहिरीवर गेली असता तिचा पाय घसरून ती विहिरीत पडली. या घटनेची माहिती मिळताच तिच्या घरच्यांनी तिला विहिरीतून बाहेर काढले व उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेबाबत अरुण नामदेव वाघमोडे यांनी खबर दिल्याने चांदवड पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस हवालदार राजू गायकवाड, पोलीस कर्मचारी विक्रम बस्ते, सुनिल जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राजू गायकवाड करीत आहे..
Discussion about this post