मंत्री अतुलजी सावे यांच्या आश्वासनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची सांगता मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे मानोरा : शेतकऱ्यांचं जीवन फार संघर्षमय आहे.कडाक्याच्या थंडीत जगंली जनावरापासन आपल्या पिकाच रक्षण करण्यासाठी रात्री बेरात्री शेतावर अबालवृद्ध जीव घेऊन जिवंतपणी मरण यातना भोगत आहे.त्यातही शेतकऱ्यांचे प्रत्येक स्तरावर सोषण केल्या जाते.शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव असो.शेतकऱ्यांच्या पांधन रस्त्याचा विषय असो.
तलाव व कॅनॉलची दुरुस्ती वा ५० -६० यानंतर वर्षापासून वहीती करत असलेल्या शेतीचे पट्टे शेतकऱ्यांच्या नावे करून देण्याचा प्रश्न असो असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यासमोर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याने परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने १८ डिसेंबर पासून विधानभवनावर शेतकऱ्यासह ठिय्या आंदोलनातून तीन पिकांची माहिती हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्याची व्यथा या आंदोलनाच्या माध्यमाने शेतकरी नेते मनोहर राठोड व पंचायत समितीच्या सदस्या छाया राठोड यांनी मांडण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस प्रशासनाकडून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.
रात्री १२:३० वाजता मंत्री अतुल सावे यांनी विधान भवनात आंदोलक मनोहर राठोड व शिष्टमंडळाला प्राचारण करून आंदोलनातील मागण्या पुढील जानेवारी महिन्यात संबंधित मंत्री व प्रधान सचिव सोबत बैठक लावून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्याने राठोड यांनी आंदोलन स्थगित केले शेतकऱ्याच्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशन ठिय्या आंदोलनाच्या माध्यमाने लक्षवेध आंदोलन शेतकरी नेते मनोहर राठोड, पंचायत समितीच्या सदस्या सौ छाया राठोड, माजी सरपंच धनराज चव्हाण, गजानन डोलारकर,राजू नाईक,रवी जाधव,धर्मेंद्र आडे,उत्तम भोईर,पांडुरंग भागदरे,अण्णा नाडेकर,दगडू नार्वेकर आदींसह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह २०२३ च्या नापिकीमुळे दुष्काळग्रस्त पिक विम्याची नुकसान भरपाई,वटफळ – मेंद्रा – रुई गोस्ता पूस नंदीचे खोलीकरण व रुंदीकरण,वनपरिक्षेत्र परिसरातील शेतीला तारकंपाऊडसाठी व प्रलंबित जंगली प्राण्यांच्या नुकसानभरपाई,चिखली धरणांची व्याप्ती वाढवून धरण मोठे करण्यात यावे.
तसेच सोमनाथ नगर येथील मंजूर धरणांचे कामं,तीर्थक्षेत्र आसोला व तिर्थक्षेत्र धोद्रा या रस्त्याचे बांधकाम निधी,मानोरा तालुक्यातील सोमठाणा व मानोरा शहरांतून वाहनाऱ्या नाल्याच्या रुंदीकरण व खोलीकरणासाठी निधीची तरतूद करुन सोमठाणा ग्रामपंचायतीला स्मशानभूमीची जागेसाठी व कोडोली येथील स्मशानभूमीकडे पुलावरून जाण्यासाठी बांधकामासाठी नाबार्ड अंतर्गत निधी देण्यात यावे,वर्षांनोवर्ष वहिती शेतीचे पट्टे शेतकऱ्यांच्या नांवे करून देण्यात यावे,वाईगौळ येथील वहितीतील शेती अकुशल दाखवून सौर ऊर्जा प्रकल्पासाठी भाडेतत्त्वावर कैडीमोल भावाने भाडेतत्त्वावर संपादन करून शेतकऱ्यांचे पिळवणूक करणाऱ्या कंपनीची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासह इतरही गंभीर प्रश्नाची सोडवणूक करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न मनोहर राठोड यांनी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे केला
Discussion about this post