विदर्भातील शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा करण्याचे आ. जाणकरांचे आवाहनमानोरा प्रतिनिधी /विशाल मोरेमानोरा : महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भरघोस मताने निवडून आलेले धनगर समाजाची पुढारी आ. उत्तमराव जानकर यांचा भव्य सत्कार तालुक्यातील माजी आमदार अनंत कुमार पाटील यांच्या हस्ते स्वगृही करण्यात आले असता अनेक मान्यवर उपस्थित होते.
माळशिरस मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदारांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की,पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे विदर्भातील शेतकऱ्याने शेती सोबत जोड व्यवसाय सुरू करावा,विदर्भात मुख्यमंत्री आहेत परंतु विकास झाला नाही. येत्या महिन्याभरात या इव्हिएम मशीनचा दूध का दूध आणि पाणी पाणी केल्या शिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
आम्ही एकूण लहान मोठ्या ३९ निवडणूक लढविल्या त्यामध्ये अनेक वेळा हार झाली परंतु आम्ही हार पत्करली नाही.तर आम्ही जे राजकारण आलो ते आमचे गुरू माजी आमदार अनंतकुमार पाटील यांच्या मुळे आलो.
माजी आमदार पाटील यांनी सांगितले की शेतकरी हा आपल्या प्रमाणे न राहता विविध प्रकारच्या जमिनीत अनेक उद्योग करतात मग लहान शेतकरी असो की मोठा असो ते शेतात घर बांधून राहतात आणि शेतात राबराब राबतात.
राजकारण करीत असताना ज्या जातीचा आमदार त्याच जातीचा विकास होतो.यावेळी माळशिरस येथील जि. प. सदस्य कचरे ,बाबुसिंग नाईक, फकीर बाबा रमेश महाराज, जेष्ठ पत्रकार शंकर आडे, विश्वनाथ ढोके आदी उपस्थित होते.
Discussion about this post