सोयगाव
शेतातील गोठ्यात दावणीला असलेल्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला करुन पाच शेळ्या ठार केल्याची घटना तालुक्यातील पहुरी बु शिवारात गुरुवारी (दि.१९) सकाळी उघडकीस आली. दरम्यान ह्या घटनेत शेतकऱ्याचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
पहुरी बु.येथील शेतकरी नामदेव रामहरी गव्हाले यांची गट.न.७५ मध्ये तीन एकर जमीन असुन शेतीस जोडधंदा म्हणून त्यांनी शेळी पालन व्यवसाय सुरू केलेला आहे.त्याच्याजवळ जवळपास अठरा शेळ्या होत्या त्या शेळ्या शेतातील पत्राच्या गोठ्यात दावणीला बांधुन संध्याकाळी घरी गेले जेव्हा मध्यरात्री बिबट्याने अचानकपणे हल्ला करुन पाच शेळ्या ठार केले तर चार शेळ्या जखमी केलेल्या होत्या गुरुवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्यावर ही घटना घडलेली निदर्शनास आली. याबाबत घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
त्यानुसार वनसंरक्षक एफ.जी.मुलताने यांनी घटनेचा पंचनामा केला आहे यावेळी आत्माराम गव्हाले,सागर गोराडे, विश्वनाथ ढवणे, कैलास तेली,हर्षल गव्हाले,प्रमोद गव्हाले,आदी उपस्थित होते
चौकट :-
पहुरी शिवारात बिबट्याच्या मुक्त संचार.
गेल्या आठ दिवसांपासून पहुरी शिवारात बिबट्याच्या मुक्त संचार वाढला असुन अनेक शेतकरीना हा बिबट्या दीसला होता गेल्या आठ दीवसापुर्वी शेतकरी रात्रीच्या रब्बी पिकांना देण्यासाठी गेले असता बिबट्याचा मुक्त संचार करताना दीसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी वनविभागाने पिंजरा लावुन ह्या बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी शेतकरीकडुन होत आहे.
Discussion about this post