
सांडपाण्याच्या समस्सेतून भिगवणकरांची सुटका होणार.
भिगवण, दि. 20 डिसेंबर
अनेक दिवसांपासून सांडपाण्याच्या व्यवस्थापनाच्या भेडसावणाऱ्या समस्येतून भिगवणकरांची सुटका होणार आहे. सांडपाणी व्यवस्थापनप्रकल्पाला जिल्हा नियोजन समितीतून ९ कोटी १० लाखांचा निधी मंजूर झाल्याने स्मशानभूमी जवळील जागेमध्ये हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. पुण्याप्रमाणेच ग्रामीण भागांमध्येदेखील सांडपाण्याची समस्या तीव्र होत आहे.
सांडपाण्याचे व्यवस्थापन होत नसल्याने ते प्रक्रिया न करता पाणी नदीत सोडले जात असल्याने दिवसेंदिवस प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी त्यामुळे या सांडपाणी व्यवस्थापन शासनाने पुढाकार घेतला आहे.
प्रकल्प (एसटीपी) साठी जिल्हा परिषदेने दिलेल्या प्रस्तावाला जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली आहे, त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून भिगवण येथे देखील नऊ कोटी रुपयांचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सांडपाण्याची समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने सदरचे काम मंजूर झाले आहे. या प्रकल्पामुळे नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी मदत होऊन दूषित पाण्याची समस्या सुटणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण माहिती ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांना दिली जाईल, तसेच या संदर्भातील कागदपत्रे ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध करून दिली जातील.
– दीपिका क्षीरसागर, सरपंच, भिगवण.
Discussion about this post