मागील 10 वर्षात चाकूर अर्बन सोसायटीने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल हा गौरव होणार आहे.
लोणावळा येथे 29 ते 31 जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय बँको सहकार परिषदेत चाकूर अर्बनचे संस्थापक अध्यक्ष युनूस मासुलदार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक अविनाश शिंदे- गुंडाळे यांनी दिली. चाकूर तालुक्यातील 2014 पासून युनूस मासुलदार यांनी सोसायटीच्या माध्यमातून आर्थिक जाळे निर्माण केले आहे.
चाकूर तालुक्यात पहिल्यांदाच चाकूर अर्बन सोसायटीला बँको पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साईबाबा जनता सहकारी बँकेचे संचालक इसरार सगरे , चाकूर नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष अरविंद भैया बिराजदार, नगरसेवक बाळू लाटे, लातूर मल्टीस्टेट चे माजी सीईओ मोहन जाधव, रशीदसाब मासुलदार, आत्माराम डाके, ओसामा मासुलदार, अशोक शेळके, रज्जाक मासुलदार, पटेल महमद रसूल,उमाकांत फुलारी, संतोष मोरे, कलीम शेख,पत्रकार सावळे श्रीधर, व कर्मचारी गायकवाड बाळू, आलाट कृष्णा, सुरणार अविनाश,भिस्ती नवाज,भटसिंगे हीना,आदीनी कौतुक केले..
Discussion about this post