गणेश राठोड
तालुका प्रतिनिधी : उमरखेड
उमरखेड तालुक्यातील टाकळी (ई) परिसरात मागील काही दिवसांपासून हिंसक प्राण्याची भितीचे वातावरण निर्माण झाले असून सध्या शेतकरी व शेतमजूर शेत शिवारात कामास जाण्यास देखील टाळाटाळ करत आहेत.अशाने शेतकरी व शेतमजूर वर्गावर उपासमारीची वेळ निर्माण झाल्यास राहणार नाही.शेतीचे संपूर्ण कामे खोळंबली जातील.
एक-दोन नव्हे तर तब्बल आठवड्याभरापासुन टाकळी (ई), येथील शेत शिवारात डेरेदाखल झालेल्या बिबट्या व अस्वलाची दहशत चांगलीच पसरली आहे. त्यातच आत्तापर्यंत अनेक नागरिकांना या अस्वल व बिबट्या प्रत्यक्ष दर्शन झाले असल्याने अनेकांची बोबडी वळाली आहे. बिबट्या व अस्वलाचे या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा किंवा त्याला जेरबंद करावे अशी मागणी करण्यात येत आहे.
आज तर बिबट्या एकच खळबळ उडाली.सकाळी शेत शिवारात कामास गेलेले शेतकरी व शेतमजूर बिबट्याच्या भितीने काही तासांतच घर गाठावे लागले.गावा शेजारीच अनेकांचे शेत असुन बिबट्या आज चक्क गावाशेजारील शेतात शिरताच काही मजुर वर्गाने वाचे प्रत्यक्ष डोळ्यांनी दर्शन घेताच पायाखालची जमीन सरकली.अशात सगळीकडे आरडाओरडा सुरू करताच मजुर वर्गामध्ये भिती निर्माण होताच घराकडे पलायन केले.सध्या तरी या हिंसक प्राण्यांपासून कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसुन झाल्यास याला वन विभाग जबाबदार राहणार हे मात्र नक्की.आज इंदल गोबरा राठोड गायकी नेहमी प्रमाणे रानात गाय चारण्यासाठी गेले असताना त्याचा मालकी बोकड जे की त्यांनी इतर राज्यातून विकत आणलेल्या बोकडवर अचानक बिबट्या ने हल्ला चढवला त्यात बोकड जागीच ठार झाले.ऐवढ्या भयानक परिस्थिती देखील गायक्याने आपले जनावरे आरडाओरडा करत घराकडे आणले.गायक्यास इतर कोणतीही दुखापत झाली नसुन पण त्याला आपले बोकड गमावावे लागले.वन विभागाकडून इंदल राठोड याना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी ग्रामस्थांनाकडून बोलले जात आहे.वन विभागाने मुक्त संचार करत असलेल्या बिबट्या व अस्वलाचे वेळेतच बंदोबस्त करावे कारण गावाशेजारील शेत शिवारात आल्यास गावात येण्यास वेळ लागणार नाही.त्यामुळे वन विभागाने हिंसक प्राण्याची बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहेत.
Discussion about this post