हातकणंगले प्रतिनिधी-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमान जनक एकेरी उल्लेख केल्याच्या निषेधार्थ आम्ही आंबेडकरवादी कृती समिती हातकणंगले यांचे वतीने हातकणंगले तहसीलदार व पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे व्यक्तव्य केले त्याचा निषेध म्हणून हातकणंगले तहसीलदार व हातकणंगले पोलीस ठाणे यांना दि २१/१२/२०२४ इ. रोजी सकाळी ११:०० वा सर्व आंबेडकरवादी अनुयायांनी मिळून निवेदन दिले आहे. यामध्ये रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष शिरीष थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राम कांबळे, दलित महासंघाचे आळतेचे विलास कांबळे, ग्रा.पं.सदस्य जावेद मुजावर, ग्रा.पं.सदस्य विकी कांबळे, हातकणंगलेचे दलित महासंघाचे मनोज कांबळे, संदीप दिवाण तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Discussion about this post