गांधी यांच्याद्वारे सूर्यवंशी कुटुंब यांचे सांत्वन
परभणी ता.23
स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू दुर्दैवी प्रकार आहे, या प्रकाराबाबत सरकारला जाब विचारला जाईल, सूर्यवंशी कुटुंबीयांना पूर्णतः न्याय मिळावा या दृष्टीने काँग्रेस पक्षाद्वारे सर्वार्थाने प्रयत्न केले जातील अशी ग्वाही लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी दिली.
गांधी हे सोमवारी दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी नांदेड येथून परभणीत दाखल झाले.तेव्हा गांधी यांचा ताफा लगेचच नवा मोंढा भागातील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी दाखल झाला.गांधी यांनी त्या ठिकाणी स्वर्गीय सूर्यवंशी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पाठोपाठ गांधी यांनी सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर हितगुज सुरू केले. तब्बल 15 मिनिटं गांधी यांनी या कुटुंबियांबरोबर चर्चा करतेवेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. घटनाक्रम समजून घेतला. सरकारने केलेल्या अन्यायबाबत माहिती घेतली. स्थानिक पदाधिकाऱ्यांना विचारणा केली. घटनेचे गांभीर्य ओळखून सूर्यवंशी कुटुंबीयांना आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, निश्चित न्याय मिळवून देऊ असे आश्वासित केले.
गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चिन्नीथाल, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे नेते विजय वटी वडेवट्टीवार, बाळासाहेब थोरात, खासदार संजय जाधव,काँग्रेसचे नेते तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर,माजी आमदार सुरेश दादा देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे आदी उपस्थित होते.
Discussion about this post