(कडेगाव)-विवेकानंद कुंभार
येथील कार्यालयात ‘ग्राहक उपभोक्ता समिती’मार्फत राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा केला गेला.
यावेळी समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष श्री.विनायक कुंभार यांनी ग्राहकांच्या विविध हक्कांविषयी,जबाबदारी विषयी,कायद्यातील तरतुदी,न्यायालयीन कामकाजाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी समितीचे सांगली जिल्हा सचिव अनुप पवार,जिल्हा कायदेशीर सल्लागार ऍड.प्रमोद पाटील,कडेगाव तालुकाध्यक्ष दिलिप झपाटे आणि कडेगाव तालुका कायदेशीर सल्लागार ऍड.सचिन ननवरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्राहक उपस्थित होते.
Discussion about this post