वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे
वैजापूर तालुक्यातील नांदूर मधमेश्वर कार्यालय येथे वैजापूर तालुक्याची लोकप्रिय नवनिर्वाचित आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
आजच्या बैठकीमध्ये नांदूर मधमेश्वर कालव्यास रब्बी हंगाम पाणी सोडण्याकरता लाभधारक शेतकऱ्यांनी आमदार साहेबाकडे मागणी केली होती.
शेतकऱ्यांची अडचण समजून घेत आमदार साहेबांनी बैठक घेऊन पहिल्या आवर्तन २५-२६ डिसेंबर च्या दरम्यान व दुसरे आवर्तन फेब्रुवारी २०२५ दरम्यान सोडवण्याचे शेतकऱ्यांच्या वतीने संबंधित अधिकारी यांना निर्देश दिले.
तसेच दोन दिवसात जास्तीत जास्त लाभधारक शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून पाण्याची मागणी करण्याची आव्हान केले.
या बैठकीस कार्यकारी अभियंता गुजरे साहेब, कालवा सल्लागार समिती सदस्य , उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील साळुंखे, शहर प्रमुख पारस घाटे, संचालक प्रशांत त्रिभुवन उपकार्यकारी अभियंता व सर्व कनिष्ठ अभियंता व शेतकरी उपस्थित होते.
Discussion about this post