लोणार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत रुजू झालेल्या प्रशिक्षनार्थी चा कालावधी सहा महिन्यावरून एक वर्ष करण्यात यावा या मागणी चे निवेदन तहसीलदार यांना युवा कार्य प्रशिक्षण तालुका संघटने कडून देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष सचिन राठोड तालुका अध्यक्ष सचिन मापारी उपाध्यक्ष मयूर चव्हाण सचिव संदीप काळे कोश्याध्यक्ष योगेश तेजनकर सह विशाल दहातोंडे समाधान बोरकर सुमित डव्हळे योगेश
तेजनकर वैभव काळे पांडुरंग सोनुने वैभव कायंदे अक्षय मोरे आकाश नागरे पवन राठोडपंढरी कायंदेरविराज काळे रवी नागरे विजय पनाड कार्तिक गुजर दानिश मोहम्मद उपस्थित होते. निवदेनात म्हटले आहे की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षनाचा कालवधी सहा महिन्यावरून एक वर्षाचा करण्यात यावा. मासिक वेतन दरमहा दहा तारखे पूर्वी देण्यात यावे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री विभागीय आयुक्त सह. आयुक्त बुलडाणा उपमुख्य कार्यपालन अधिकारी बुलडाणा सह राज्य कार्यालय मुबई यांना देण्यात आल्या.
Discussion about this post