
सारथी महाराष्ट्राचा..
उदगीर/प्रतिनिधी : सुकणी येथील कै.कल्याणराव माणिकराव मुळे यांच्या प्रथम वर्ष श्राद्ध निमित्त गावातील अंगणवाडी,जिल्हापरिषद शाळा,स्वा.सावरकर माध्यमिक विद्यालय,या शाळेतील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वही,कंपास व पॅड इत्यादी साहित्य आयोजक श्री जीवन कल्याणराव मुळे,श्री राहूल जिवनराव मुळे व श्री विकास जिवनराव मुळे यांच्या सौजन्याने वाटप करण्यात आले.तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती सौ.आशाताई नागनाथ जाधव -सरपंच,श्री शिवाजीराव रावसाहेब सुकणे -उपसरपंच,श्री सुनिल रामराव सुकणे -माजी सरपंच,श्री विठ्ठलराव दिगांबर मुळे -चेअरमन,सौ.मिरा सुनिलराव सुकणे -मुख्याध्यापिका,श्री विठ्ठल गोविंदराव मुळे,श्री दिलीप व्यंकटराव जाधव- माजी मु.अ.,श्री बाळासाहेब माधवराव जाधव-मुख्याध्यापक,श्री नारायण जयवंतराव मुळे -तंटामुक्तीअध्यक्ष,श्री कमलाकर किसनराव मुळे-शिक्षक,श्री तातेराव रामचंद्र मुळे,माणिक लक्ष्मण मुळे,मंगेश मदनराव पाटील-पञकार,भाऊराव कल्याणराव मुळे,गणपत कल्याणराव मुळे,चंद्रकांत गणपतराव मुळे,आशिष भाऊराव मुळे,अविनाश भाऊराव मुळे यांची उपस्थिती होती.तसेच ह.भ.प.हरी महाराज आजनसोंडकर यांचे कीर्तन झाले व त्यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला. अशा या कार्यक्रमाबद्दल त्यांचे गावकऱ्यांनी कौतुक केले..
Discussion about this post