विज्ञान शाखेचे माजी विद्यार्थ्यांनी रियुनियन-२०२४ सोहळ्याच्या माध्यमातून २० वर्षानंतर एकत्र आले. नांदेड येथील हॉटेल चतुर्थीच्या सभागृहात हा स्नेह भेटीचा सोहळा दि. २२ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला.
आजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून सर्व वर्गमित्र आणि मैत्रिणी मोठया संख्येने रियुनियन-२०२४ या सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते.हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाची विज्ञान शाखेची २००३ ची बॅच ही एक यशस्वी बॅच म्हणून परिचित आहे. या बॅचचे विद्यार्थी डॉक्टर्स, इंजिनिअर्स, मोठे व्यावसायिक, प्रशासकीय अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, शिक्षक-शिक्षिका बनून वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करीत आहेत.
पण दैनदिन जीवनातून वेळ काढून ते २० वर्षानंतर एकत्र भेटले. या स्नेह सोहळ्यात सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. या सुवर्ण क्षणी सामाजिक बांधिलकी जपणे हे कर्तव्य समजूनया सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी नांदेड येथील ३८ अनाथ शालेय मुलींना थंडीच्या बचावासाठी जॅकेट्स भेट दिल्या. सोबतच काही शालेय साहित्य पण वितरित करण्यात आले. आपल्या मेजवानी सोबत यासर्व अनाथ मुलींनाही मेजवानीचे आयोजन केले होते.
हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच्या अनेक आठवणी मनात आहेत. त्या वेळची परिस्थिती बेताची होती त्यामुळे शिक्षणाच्या संघर्षातून आम्ही घडलो विस वर्षांनंतर वर्ग मित्रांच्या भेटीने आनंद झाल्याचे ग्रामविकासअधिकारी नारायण काळे यांनी सांगितले.
गत २० वर्षांपासून आपल्या शालेय वर्ग मित्रांसोबत भेट होत नव्हती. आज सर्वांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. एकेकाळी आम्ही विद्यार्थी होतो.
त्यातील आज प्रत्येक जण अनेक पदावर कार्यरत आहेत. याचा आनंद आहे. मी देखील ग्रामीण भागातील विद्यार्थी मात्र ठाण्यासारख्या ठिकाणी स्वतःचे रुग्णालय उभारु शकलो ते केवळ शिक्षणातून व या शाळेतील शिक्षकांमुळेच आम्ही घडलो असे डॉ. किरण करेवाड यांनी सांगितले.
Discussion about this post