पालम प्रतिनिधी:
आज दिनांक 27 डिसेंबर रोजी पालम येथे श्री संत रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पालम शहरातुन टाळ मृदंगाच्या स्वरात श्री संत रंगनाथ महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली , यावेळी श्री संत रंगनाथ महाराज मंदिरापासून ते शनिवार बाजार ते मुख्य चौकातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून पालम येथे मुख्य चौकात फुगडी खेळण्यात आली या वेळी पालम शहरातील सर्व समाज बांधव एकत्र येऊन राम कृष्ण हरी च्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी हे.भ.प.नारायण महाराज यांचें काल्याचे किर्तन ठेवून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण समाज बांधव यांनी अनेक प्रकारच्या धार्मिक कथा प्रबोधन पर विविध प्रकारचे कार्यक्रम केले,या मध्ये काही सजिव देखावा सादर करण्यात आला असून सर्व व्यवस्थापक यांनी अत्यंत, दक्षता पूर्वक सर्व समाज बांधवां ना में एकत्र येऊन ऊन संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन मिरवणूक अत्यंत शांतता पुर्वक पार पाडली. यावेळी पालम येथिल गणेशराव रोकडे,( दादा) वसंत काका सीरस्कर, भास्करराव सिरसकर, शाहुराव काका पत्की, लिंबाजी टोले, हरी काका नारलेवार, जगन्नाथ रोकडे, मुन्ना सेठ रुद्रवार, दिलिपराव रोकडे, रामजी मणियार,मणकुलवार गुरूजी, गजानन नारलेवार, शंकर कन्नावार, भगवान चेऊलवार, तनुजा नारलेवार, सुजित तालेवार, रुद्रवार, गजानन गडम, आदी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होती.

Discussion about this post