आज दिनांक 26 डिसेंबर रोजी पालम पोलिस स्टेशन चे निरीक्षक सुरेश थोरात यांना पेठशिवणि शिवारात गांजाची झाडे असल्याची गुप्त माहिती मिळाली मिळालेल्या, माहितीनुसार थोरात यांनी सापळा रचून गांजाची झाडे केली जप्त.सदरिल घटना पालम तालुक्यातील पेठशिवणि शिवारातील गट नंबर 40/12 मधील शेतात मिळालेल्या माहितीनुसार पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास गांजाची झाडे आले त्या वेळी पोलिस आल्याचं समजताच शेतकरी माधव हंगंरगे हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र फौज फाटा जास्त असल्यामुळे तो पळून जाण्यास असमर्थ ठरला लगेचच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडले.यावेळि शेतात कमित कमि बारा किलो गांजा सापडला असून त्यांची किंमत अंदाजे दोन लाख रुपये आहे , यावेळी पोलीस निरीक्षक यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या अनुमती घेऊन सदरील गांजा जप्त केला,व रात्रि च उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला .या वेळी पोलिस निरीक्षक सुरेश थोरात, उपनिरीक्षक के.एस.दवघरे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लोखंडे, पोलिस हेड.का.कल्याण साठे, जमादार बाळवटे, बालाजी मोरे,पि.सि.सिंघमवाड, सारंग शहाने व नायब तहसीलदार राजेश्वर पवळे हे घटना स्थळी उपस्थित होते, आरोपी सोबत गांजा ची झाडे देखील पोलिस स्टेशन ला आणण्यात आली आहे,पुढिल तपास पोलीस करत आहेत.
Discussion about this post