गुणवत्ता संवर्धन अभियान अंतर्गत वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब या प्रशालेत पंचायत समिती इंदापूर यांचे तर्फे तालुकास्तरीय शाळा तपासणी शुक्रवार दिनांक 27. 12. 2024 रोजी संपन्न झाली.
सदर शाळा तपासणीसाठी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मा. श्री. अजिंक्य खरात साहेब, केंद्रप्रमुख मा. श्री. दराडे साहेब, विषय तज्ञ मा. श्री. सय्यद सर, मुख्याध्यापक मा. श्री.जाडकर सर, मा. श्री. चव्हाण सर, मा. श्री. पाठक सर, मा. श्री. जाधव सर, मा. श्री. भोसले सर, मा. श्री. वनवे सर उपस्थित होते.
सदर तपासणीमध्ये विद्यालयाची गुणवत्ता, भौतिक सुविधा, शालेय उपक्रम अशा विविध बाबींची तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर तपासणी पथकाने विद्यालयाची गुणवत्ता, भौतिक सुविधा, शालेय उपक्रम अशा सर्वच बाबीं बाबत समाधान व्यक्त केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तपासणी पथकाला तपासणीसाठी विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री.अर्जुन सर, पर्यवेक्षक श्री.आळंद सर, जुनिअर विभाग प्रमुख श्री.सावंत सर, श्री धनवडे सर, श्री. काशीद सर श्री शेख सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले..
Discussion about this post