डहाणू येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचा यशस्वी उपक्रमडहाणू: महिला व बालकल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत जांबुगाव मानपाडा येथे आयोजित महिला मेळावा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला. या मेळाव्याचा उद्देश महिलांना एकत्र आणून विविध विषयांवर मार्गदर्शन करणे व त्यांच्या सक्षमीकरणाला चालना देणे हा होता.
कार्यक्रमात कोल्हापूर पोलिस दलात निवड झालेल्या कोमल दिनेश वडालिया या युवतीचा तिच्या आई मंगला दिनेश वडालिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्कारामुळे परिसरातील मुलींना प्रेरणा मिळाली व उच्च ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संदेश देण्यात आला.घोलवड विभागातील अंगणवाडी सेविकांनी “लेक लाडकी योजना” या महत्त्वपूर्ण उपक्रमावर पथनाट्य सादर केले.
मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती घडवणारे हे पथनाट्य उपस्थितांसाठी प्रभावी ठरले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते, यामध्ये श्रीम. ज्योती पाटील (जिल्हा परिषद सदस्य)श्रीम. प्रेमा करबट (सरपंच, जांबुगाव)श्री. रविंद्र बुजड (सरपंच, घोलवड)श्री. सतीश पोळ (बालविकास प्रकल्प अधिकारी, डहाणू)श्रीम. रूपाली देशमुख (कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड)श्री. अरविंद बेंडगा (सामाजिक यूट्यूबर)श्री. धिरज महाले (डॉक्टर)श्रीम. माधुरी निमला (ग्रामपंचायत सदस्य)या उपक्रमात अंगणवाडी सेविका व महिला प्रतिनिधींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले.या महिला मेळाव्याचा परिणाम म्हणून डहाणू परिसरात महिलांना प्रोत्साहन व मुलींना प्रेरणा मिळाली आहे. उच्च उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक महिलेला सक्षम बनवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून दिसून आला.
Discussion about this post