हवेली तालुका प्रतिनिधी
कोंढणपूर फाटा येथे कायम वाहतूक कोंडी होत असून,त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
पुणे शहरातील नवीन समाविस्ट गावात कराची रचना बदलल्यामुळे मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे श्रीरामनगर, शिवापूर, आर्वी या भागात मोठ्या प्रमाणात गोडाऊन झाले असून अनेक कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे या भागातील रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोंढणपूर येथील तुकाई मातेची यात्रा सुरु असून तेथेदेखील महाराष्ट्रातून अनेक भाविक येत आहेत. त्यामुळे कोंढणपूर फाटा येथे सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असून शाळकरी मुले, कामगार आणि स्थानिक नागरिक यांचे हाल होत आहेत.
या वाहतूक कोंडीवर कायम स्वरूपी उपाय योजना करावी व गर्दीचे वेळी वाहतूक नियंत्रक नेमण्यात यावा अशी मागणी शिवसेना पदाधिकारी नितीन वाघ, रवी मुजुमले, अरुण घोगरे, उमेश सुर्वे, पुंडलिक पवार, आदित्य बांडे हवलदार, निवृत्ती वाव्हळ, शिवम लांडगे यांनी राजगड पोलिसांकडे केली आहे.
Discussion about this post