आज वार शनिवार दि.28/12/2024 रोजी सकाळी दहा वाजता वनराई बंधारा बांधण्यासाठी सुरुवात झाली असता.. ग्रामपंचायत सरपंच रेश्मा घरत, भरत घरत, बाळाशेठ घरत, हिरामण घरत, पोलीस पाटील अण्णा घरत, भाऊ घरत, सुभाष घरत, कुणाल पवार,कान्होळ-बोरिवली चे ग्रामसेवक जितेश पवार, अर्चना घरत, आशुतोष घरत, व बोरिवली शाळेतील इयत्ता चौथी पाचवी चे विदयार्थी व शिक्षक वृंद बोरिवली यांच्या श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्यात आला…
त्यावेळी विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्व कळले… छोटे छोटे धरण,ओढे यांना बांध घातल्यानंतर पाणी आडवल्यानंतर.. पशुपक्षी, प्राणी, मानवाला शेतीसाठी पाण्याचा कसा उपयोग होतो. गाव तिथे वनराई बंधारा ही संकल्पना अमलात आली पाहिजे असे राणे सरांनी सांगितले.
पाणी हे जीवन आहे, जलसाठे कमी होत आहेत.म्हणून पाणी जपून वापरा. पाण्याचे महत्व प्रत्येक विद्यार्थ्याला,गावाकऱ्याला कळलं पाहिजे…
Discussion about this post