सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक 27.12.2024
माढा तालुक्यातील कांदा पिकतील प्रसिद्ध गाव म्हणून ओळखले जाणारे पडसाळी येथील शेतकरी श्री. महेश आण्णासाहेब पाटील यांनी योग्य नियोजन आणि आपले कौशल्यतुन ही किमया करू दाखवली आहे.
पाटील यांचा एकुण 4 एकर कांदा केला आहे त्या मधील एक एकर शेता मध्ये 5 लाख उत्पन्न मिळाले असून तीन एकर मधुन
15 लाख उत्पन्न येईल असे अपेक्षित आहे
एक एकर शेतामधुन पंचगंगा वाण तुन 50kg च्या 240 बॅग निघाल्या त्यांनी बंगळुरू येथे स्वतःच जाऊन बाजारात कांदा विकला त्यांना 5730रू असा दर मिळाला.
कांदा पिक लागवड, फवारणी, खत, काढणी, वाहतूक यासाठी 72 हजार खर्च आला सर्व खर्च वजा जाता त्यांना 5 लाख 11 हजार निवळ नफा मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी बी, पाणी खत, फवारणी, योग्य मार्केटिंग नियोजन केले तर नक्कीच चांगले उत्पन्न मिळते हे सिद्ध करू दाखवले
महेश पाटील याचा सर्व शेतकऱ्यांना आदर्श, योग्य सल्ला घेवु कांदा पिकातून चांगले उत्पन्न काढावे
कष्ट करणं थांबवु नका, कारण येणारा काळ तुमचाच असणार आहे.
सारथी महाराष्ट्राचा
सोपान चंद्रकांत चव्हाण
मो 8805559552
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
Discussion about this post