प्रतिनिधी-विजय बारस्कर
दिनांक 27 12 2024 पासून सर्व अपंग व्यक्तींना व साठ वर्षावरील वृद्ध महिला व पुरुषांना निशुल्क भोजनाची व्यवस्था यवतमाळ येथे नेहरू चौक मेन लाईन यवतमाळ येथे करण्यात आलेली आहे.
सविस्तर बातमी अशी की संजय राठोड मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य यांनी उद्घाटन करून त्यांच्या नेतृत्वात युवा सेना यवतमाळ जिल्हा तर्फे सर्व अपंगांना व साठ वर्षावरील वयोवृद्धांना दररोज एक वाजता निशुल्क भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे अपंगात किंवा जीर्ण वयोवृद्धांना डबा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे शंभर ते दीडशे डब्यांची सध्या मागणी चालू आहे यवतमाळ शहरातील समस्त बंधू व भगिनींना शुभ कार्यास सहभागी होण्याची विनंती केलेली आहे अशी माहिती महेश पवार युवा सेना जिल्हाप्रमुख यांनी दिलेली आहे.
Discussion about this post