उदगीर/प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हकनाकवाडी ता.उदगीर जि.लातूर येथे कार्यरत असलेले प्राथमिक पदवीधर मधुकर मरलापल्ले,नवनियुक्त केंद्रप्रमुख शेषेराव राठोड व नवनियुक्त मुख्याध्यापक काशिम शेख यांचा निरोप व स्वागत सोहळा दिनांक २७|१२|२०२४ रोजी आयोजित करण्यात आला.हकनाकवाडी शाळेच्या वतीने दिनांक २७|१२|२०२४ रोजी पदोन्नती सत्कार सोहळा संपन्न झाला.
प्रस्ताविकात शाळेतील शिक्षक संजीव पांचाळ यांनी तिघांच्या जीवनावरसविस्तर माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.के.शेख गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उदगीर,प्रमुख पाहुणे विस्तारअधिकारी नितीन लोहकरे ,व्यंकटेश पेद्देवाड,मुख्याध्यापक माधवराव फावडे,ज्ञानेश्वर बडगे,ज्ञानेश्वर बोयणे आदी उपस्थित होते.पदोन्नती झालेल्या तिघांच्याही जीवनावर गटशिक्षणाधिकारी यांनी कामकाज,शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली.या बाबतीत गटशिक्षणाधिकारी शफी शेख,शिक्षणविस्तार अधिकारी नितीन लोहकरे,मुख्याध्यापक माधवराव फावडे,ज्ञानेश्वर बडगे,तसेच केंद्रप्रमुख मधुकर मरलापल्ले,शेषेराव राठोड व मुख्याध्यापक काशिम शेख यांनी समयोचित भाषण केले.
Discussion about this post