भडगाव प्रतिनिधी
भडगाव शहरातील एका नगरमधील 22 वर्षीय महिलेला बळजबरीने सांगितले की मी तुझा अंघोळ करताना व्हिडियो काढला आहे. तो व्हिडियो मी तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाठून देईल व अनेक धमक्या देऊन दोन महिन्या पूर्वी रात्री दोन वाजता बळजबरी घरात घुसून अनैतिक संबंध केले म्हणुन भडगाव पोलिस स्टेशन ला एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत भडगाव पोलिसात फिर्याद दाखल करणाऱ्यानी फिर्यादीत म्हटले आहे की,
आरोपी याने फिर्यादी यांना मी तुझा आंघोळ करतांनांचा व्हीडीओ काढला आहे. तो मी तुझ्या होणा-या नव-याला पाठवून देईल तुझ्या बहिण भाउला मारुन टाकेल. अश्या धमक्या धमकी देवून फिर्यादी यांचेशी दोन महिन्या पूर्वी रात्री दोन वाजता बळजबरीने फिर्यादी यांचे इच्छेविरुध्द फिर्यादी यांचे घरात जावुन फिर्यादीशी शारीरीक संबंध केले. म्हणुन भडगाव पोलिस स्टेशन ला गु.र.न. ४७१/२०२४ भा. न्या. संहिता ६४(१),३३३,३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
Discussion about this post