प्रभाकर गारे प्रतिनिधी त्रंबकेश्वर52 वे त्र्यंबकेश्वर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
दिनांक 27 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उदघाटन कार्यक्रम त्र्यंबकेश्वर पंचायत समिती गटविकास अधिकारी मा. श्री गजानन लेंडी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर मा. मनोहर सूर्यवंशी (गटशिक्षणाधिकारी प.स.त्र्यंबकेश्वर)’श्री.राजदादा आहेर (विस्तार अधिकारी),श्री.विजय पगार(विस्तार अधिकारी),श्री.मुकुंदा गायकवाड(मुख्याध्यापक),भिलमाळ गावचे सरपंच श्री.पेहरे,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक, आदी उपस्थित होते.
दिनांक 28 डिसेंबर रोजी बक्षिस वितरणाचा कार्यक्रम मा. श्री मनोहर सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.प्रसंगी व्यासपीठावर श्री राजदादा आहेर(विस्तार अधिकारी),मुख्याध्यापम श्री गायकवाड सर,कार्यवाह श्री.रौदळ सर,परीक्षक आदी उपस्थित होते.
सदर विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक(1ते 5 ),उच्च प्राथमिक(6ते8),माध्यमिक(9 ते12) या गटातून अनुक्रमे 23,51,38 प्रतिकृतींची मांडणी करण्यात आली,या व्यतिरिक्त शैक्षणिक साहित्य,प्रयोगशाळा परिचर यांचेही साहित्य मांडणी करण्यात आली.* यशाचे मानकरी
प्राथमिक गट(1ली ते 5वी)
प्रथम- जि.प.प्राथ.शाळा खरोली
द्वितीय-स्वामी सोमेश्वरानंद त्र्यंबक
तृतीय-जि.प.प्राथ.शाळा पिंपळद
उच्च प्राथमिक गट(6वी ते 8वी)
प्रथम-आश्रम शाळा वाघेरे
द्वितीय-जि. प.प्राथ. शाळा विनायकनागर.
तृतीय-एम आर पी एच कन्या विद्यालय त्र्यंबक
आदिवासी गट-अनु.आश्रम शाळा पिंप्री(त्र्यं)
माध्यमिक गट(9 वी ते 12 वी)
प्रथम-माध्यमिक आश्रम शाळा त्र्यंबक
द्वितीय-शा. मा. आश्रमशाळा भिलमाळ
तृतीय-आश्रमशाळा वाघेरे
आदिवासी गट-जनता विद्यालय त्र्यंबक
शैक्षणिक साहित्य
प्राथमिक गट
जि.प.प्राथ शाळा सापगाव
माध्यमिक गट
आश्रम शाळा वाघेरे
प्रयोगशाळा परिचर गट
आश्रमशाळा वाघेरे
दिव्यांग गट प्राथमिक-जनता विद्यालय त्र्यंबक
दिव्यांग माध्यमिक गट-आश्रम शाळा वाघेरे.
Discussion about this post