26 Total Views , 1 views today
4 जानेवारी रोजी निघणार मूक मोर्चा
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी.7218275486.
आज सर्व मराठा संघटना, सकल मराठा समाज ,सर्व पक्ष हिंदुत्ववादी संघटना सर्व जाती धर्मातील लोकांची बैठक हॉटेल अतिथी परभणी येथे पार पडली यावेळी सर्वानुमते बीड मधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण आणि हत्या प्रकरण झाले त्याचा सर्वप्रथम सर्वांच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी सर्व जाती धर्मातील पदाधिकारी यांनी या घटनेचा निषेध करून आपली मनोगत व्यक्त केले हे
प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात तातडीने चालवण्यात यावी सर्व आरोपीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रकरणांमध्ये जेष्ठ विधी तज्ञ यांची नियुक्ती व्हावी त्याचप्रमाणे हे प्रकरण बीड येथे न चालविता मुंबई येथे चालवावे व पीडित कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी एक मताने सर्व मराठा संघटनांनी,सकळ मराठा समाज व सर्व पक्षांनी केली आहे
यासाठी दिनांक 4 जानेवारी सकाळी 11 वाजता नूतन महाविद्यालय शिवाजी चौक गांधी पार्क मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत मूक मोर्चा निघणार आहे व त्याचे रूपांतर उपोषण मैदान येथील सभेत होणार आहे या मोर्चात स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे कुटुंब उपस्थित राहणार आहे यावेळी सर्व सामाजिक संघटना सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व सामाजिक कार्यकर्ते यांची मोठी उपस्थिती या बैठकीला होती
1 एक जानेवारी रोजी जिल्हास्तरीय बैठक परभणी मध्ये संपन्न होणार आहे सर्व बांधवांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी यावे ही विनंती करण्यात आली आहे
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486.
Discussion about this post