………………………………..
लोहोणेर-:येथील मविप्र समाज संस्थेच्या जनता विद्यालयात एम.के.सी.एल व मानस कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट लोहोणेर यांच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी मिशन सायबर सेक्युरिटी व कृत्रिम बुद्धिमत्ता यावर मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.सदर कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.एच.देसले हे होते आयोजक विशाल देशमुख यांच्यासह एम. के.सी.एल चे नाशिक विभागाचे समन्वयक सुभाष पाटील हे प्रमुख मार्गदर्शक तर गौतम विधाते सह मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.यावेळी विद्यालयाच्या व मानस कॉम्पुटर यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर समन्वयक सुभाष पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आजच्या विज्ञान तंत्र ज्ञानाच्या युगात सायबर सेक्युरिटी हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला असून विविध ऑनलाईन स्रोतांच्या माध्यमातून लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून त्याच्या पासून बचाव करण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती देत सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेल्या फेक लिंक्सवर क्लिक करण्याअगोदर काय खबरदारी घेतली पाहिजे याचे मार्गदर्शन केले.
तसेच जर आपली फसवणूक झाली असल्यास सरकारच्या कोणत्या पोर्टलवर तक्रार नोंदवावी याची माहिती दिली. त्याचबरोबर सायबर क्राईम काय आहे त्याने काय होऊ शकते आणि सोशल मिडीयाचा वापर प्रत्येकाने सुयोग्य पद्धतीने कसा करावा याचे मार्गदर्शन करत कृत्रिम बुद्धिमत्तेविषयी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलेत्याचबरोबर या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने कोणत्या गोष्टी साध्य होऊ शकतात या विषयीची माहिती दिली. विद्यालयाचे इयत्ता १०वी चे सर्व विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षक एस.डी.रौंदळ डि.के आहेर,एल.व्ही.वाघ,एच.ए.निकम, सलीम शहा आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वआभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सुलतान शेख, संतोष आवारी,प्रेरणा पाटील,करण अहिरे,प्रसाद महाजन आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंदांनी सहकार्य केले.
फोटो ओळ-:लोहोणेर येथील जनता विद्यालयात मिशन सायबर सेक्युरिटी व कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एम.के.सी.एल नाशिक विभागाचे समन्वयक सुभाष पाटील समवेत मुख्याध्यापक आर.एच.देसले, विशाल देशमुख, गौतम विधाते आणि विद्यार्थी.(छाया-:सुनिल एखंडे)
Discussion about this post