
मुरगूड-निपाणी
मार्गावर सुरुपलीजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली
खाली सापडून मुरगूडमधील आरोग्यसेविका क्लारिन संतान बारदेस्कर (४८) यांचा जागीच मृत्यू झाला. ड्युटीवरून घरी परतताना हा अपघात झाला.
आरोग्यसेविका क्लारिन बारदेस्कर या चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवेत आहेत.
सोमवारी सायंकाळी चिखली आरोग्य केंद्रातर्गत कौलगे गावात सर्वेक्षण करून त्या बस्तवडे फाट्यावर आल्या.
तेथून मुरगूडकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला विनंती करून त्याच्या दुचाकीवर बसल्या.
दरम्यान, सुरुपलीजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या मुरुमावरून दुचाकी घसरली.
आणि दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूपट्टीकडे पडला तर मागे बसलेल्या क्लारिन बारदेस्कर रस्त्यावर पडल्या.
त्याचवेळी तेथून जाणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली त्या सापडल्या.
पोटावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला.
श्रीमती बारदेस्कर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरगूड ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी गर्दी केली होती.
या अपघाताची मुरगूड पोलिसात नोंद झाली आहे.
अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे करत आहेत.
Discussion about this post