वैजापूर (छत्रपती संभाजीनगर):- वैजापूर तालुक्यात पिढ्यान पिढ्या शेतकऱ्यांचा शेतरस्त्यासाठी चाललेला संघर्ष थांबावा यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या वतीने चळवळीच्या माध्यमातून राज्यभर सुरू केलेल्या आंदोलनाला राज्यभर मोठा शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असून जिल्हा तहशील कार्यालयात शेतरस्त्या संबंधात गांभीर्य निर्माण करत खेडोपाडी गावोगावचे शेतकरी चळवळीत सहभागी होत असून या आंदोलनाला न्यायालयीन प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यालयाकडून शेतकऱ्यांची शेतरस्त्यांसाठी होणारी हेळसांड थांबवण्यासाठी विविध सामाजिक संघटनाअन्नदात्याच्या पाठीशी उभे राहत आहे त्यातच वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नियोजित बैठकीत राजव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले.
यावेळी वैजापूर शिव पानंद शेतरस्ता कृती समितीची स्थापना करण्यात आली त्यानंतर वैजापूर तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांनी अतिशय गांधीगिरी मार्गाने प्रशासनाला शेतरस्त्या संबंधित विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत गावोगावी ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश ग्रामपंचायतींना देत शासन निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भात सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या.
त्याचबरोबर दर पंधरा दिवसाला शेतरस्त्यांठी जनअदालत दिन सुरू करण्याचे आश्वासन दिले यावेळी तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर राखत शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी तहसीलदारांना शुभेच्छा दिल्या यावेळी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेत रस्ता चळवळीचे वैजापूर तालुका कृती समितीचे भारत सोनवणे पाटील, अनिल सूर्यवंशी, वाल्मीक मगर रवींद्र मोईन, गणेश लाटने, भाऊसाहेब मोईन, संजय राजपूत, अनिल तुपे, कल्याण मगर, अनिल सोनवणे, गोकुळ सोनवणे, तुळशीराम मोईन, प्रकाश सूर्यवंशी व वैजापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
Discussion about this post