



ता.प्रतिनिधी :
पीएमश्री जिल्हा परिषद शाळा मांगलादेवी येथे विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना प्रत्यक्षात व्यवहारातून कळावा, नफा-तोटा, खरेदी-विक्री, व्यवहार ज्ञान कळावे यासाठी बाल आनंद मेळावा अंतर्गत “खरी कमाई” हा उपक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. प्रमोद पुनसे, उपाध्यक्ष निरंजन देव्हारे, सरपंच रवीपाल गंधे महाराज, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य स्वप्नील ढोमने, उज्वला राजूरकर,जयश्री सहारे,जयश्री शेळके,मुख्याध्यापक राजू विलायतकर, जगदीश खाडे, राहुल मिस्किन, प्रदीप नाईकर,सुधीर बेदरकर,अंकुश ढबाले,प्रीती घोटेकर,मोनाली काळे आदी उपस्थित होते.
विद्याध्यांनी यासाठी विविध खाद्यपदार्थ बनवून आणले होते. खाद्य पदार्थ, फळे, भाजीपाला,पाणीपुरी,कचोरी,सांबार वडी, खास्ता पापड आदी अनेक मेनू आणले होते. विक्रीसाठी एकूण ३० स्टॉल लावण्यात आले होते. यातून अंदाजे १४ हजार रुपयांची खरेदी विक्री उलाढाल झाली. खरेदीसाठी गावातील नागरिक, शाळेतील शिक्षक, अंबिका विद्यालयाचे विद्यार्थी व शाळेतील विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती. कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला..
Discussion about this post