नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळाबरोबर गेल्या अकरा महिन्यांमध्ये राज्याबरोबर जिल्ह्यामधील महसूल वाढीमध्ये तळीरामांनी आपली भूमिका चोख बजावत १४ कोटी लिटर हुन अधिक मद्याचे सेवन करत महसूल वाढीमध्ये खारीचा वाटा उचलला आहे. जिल्ह्यातील गत वर्षी ३७९ कोटींचे महसूल उद्दिष्ठ होते त्यामध्ये यंदा ३१ टक्क्यांनी वाढून ५३९ कोटींचे आहे हे उद्दिष्ट मार्च २०२५ अखेर पूर्ण झालेले असेल असा विश्वास राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. ते म्हणाले कि राज्य उत्पादन शुल्क हा शासनाच्या महसूल वाढीमध्ये भर घालणारा महत्वाचा विभाग आहे. आमच्या विभागाला दर वर्षी उद्दिष्ठ दिले जाते यंदाही आहे आणि आम्ही ते यंदाही पूर्ण करू. दोन निवडणुकांच्या काळामध्ये दारूची अवाक मोठ्या प्रमाणावर झाली. अकरा महिन्यांच्या कालावधी मध्ये बियर आणि विदेशी दारू मध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. विदेशी दारूच्या विक्री मध्ये ८. २४ टक्के तर तर वाईन मध्ये ४९.२३ टक्के वाढ झाली आहे. मात्र दारूच्या दरामध्ये मध्ये वाढ झाल्याने देशी दारू विक्री मात्र अगदी नगण्य प्रमाणात घातली आहे. मात्र महसूल वाढी मध्ये फारसा प्रभाव पडला नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यंदाही आम्ही आमचे महसूल वाढीचे टार्गेट पूर्ण करू.
Discussion about this post