प्रतिनिधी:- मुकुंद गायकवाड
हनुमान-टाकळी येथे श्रीमती उषाताई मरकड-अकोलकर मॅडम यांच्या निरोप समारंभ दिनांक २१/१२/२०२४ रोजीच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळेने व गावकऱ्यांनी त्यांचा यथोचित सन्मान करून केला होता . यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मा. अनिल भवार साहेबांसह अनेक सेवा निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, नातेवाईक , ग्रामस्थ उपस्थित होते.
मात्र, शिक्षक व विद्यार्थी या नात्यातील वीण नेहमीच घट्ट असते हे आज अनुभवायला मिळाले. आदरणीय मरकड मॅडम यांच्या चि. स्वराज गायकवाड या लहानग्या विद्यार्थ्याने मॅडम सह अन्य गुरुजनांना त्यांचा सन्मान करण्यासाठी स्वगृही बोलवण्याचा हट्ट धरला व आपल्या चिमुरड्या हाताने स्वतः पुष्पगुच्छ बनवून त्यांना आज दि.३१ डिसें.२०२४ रोजी पुन्हा एकदा सन्मानित केले व परिवाराने त्यांचे औक्षण करत त्यांच्या भावी आरोग्यमय जीवनासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. तेव्हा उपस्थित गुरुजनांनी चि. स्वराज चे कौतूक करत त्यास भविष्यात वेळोवेळी मार्गदर्शन करण्याबाबत आश्वासित केले. याप्रसंगी विधीज्ञ श्री.संदीप अकोलकर यांनी प्रोफेशनॅलिझम च्या जगात गुरू-शिष्याची परंपरा जोपासने ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी श्रीमती. सुनिता गुंजाळ मॅडम, रेखा म्हस्के मॅडम, श्री.संभाजी बेरड सर श्री.संभाजी पठाडे सर, श्री.योगेश गायकवाड, सौ.माधूरी गायकवाड, श्री.विष्णू गायकवाड, सौ.आशा गायकवाड यांसह श्रीमती.मरकड मॅडम यांचे माहेरकडील आप्तेष्ट सौ.स्मिता अकोलकर, चि.सोहम व चि. शौर्य अकोलकर हेही यावेळी उपस्थित होते.
Discussion about this post