राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने युवानेते अब्दुल भैय्या शेख यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.
युवा नेते अब्दुल भैय्या शेख यांनी डोल प्रकरण, रेशनकार्ड समस्या, बँक कर्ज समस्या, बचत गट योजना, आधार कार्ड दुरुस्ती, महिलांसाठी पिंक रिक्षा योजना, नवीन मतदार नोंदणी, अपंग योजना, रोजगार व नोकरीसाठी मार्गदर्शन, तसेच लाडकी बहिण योजना यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन केले आहे.
संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करून त्यांना हक्काचे लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. “आपला लढा सर्वसामान्यांसाठी” या उद्देशाने कार्यरत असल्याचे शेख यांनी सांगितले.
Discussion about this post