अकोला प्रतिनिधि गणेश वाडेकर
*03/01/2025
अकोला:
अकोला पोलिस दलाने अंतर्गत १ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत विशेष शोध मोहिम राबविली. त्यामध्ये अपहृत मुले, मुली- १६, हरविलेले महिला २२५, पुरुष १२५, बेवारस बालक १३२ एकुण तब्बल ४९८ शोध घेऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक शंकर शेळके, महिला पोलीस कर्मचारी अनिता टेकाम, उज्वला इंगळे ऑपरेशन मुस्कान तेरा या मोहीमेचे आयोजन करून सदर मोहीमेंतर्गत सर्व पोलीस स्टेशनमधून हरविलेल्या महिला, पुरुषांचा शोध घेतला.
Discussion about this post