पन्हाळा, 28 डिसेंबर: पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे गावात स्वर्गीय बळवंत दत्तू मोरे (गुरुजी) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन त्यांचे सुपुत्र सूरज बळवंत मोरे यांनी केले.
या प्रसंगी विद्या मंदिर सावर्डे प्राथमिक शाळेतील सहावीतील विद्यार्थिनी कु. श्रद्धा सचिन यादव हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिने 35 किलो वजनी कुस्ती गटात तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. तिच्या या यशाबद्दल सूरज मोरे यांच्या हस्ते तिला गौरवण्यात आले.
“पुण्यतिथी आणि वाढदिवस यांसाठी मोठ्या खर्चाच्या कार्यक्रमांऐवजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे ही काळाची गरज आहे. शिक्षणाला चालना देणे हेच खरे समाजसेवेचे कार्य आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच बाळासाहेब पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील सागर यादव, डॉ. अनिल सावंत, डॉ. मनोहर मोरे, आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश बच्चे उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रय आसगावकर सर, रणसिंग सर, गोरड सर, पाटील सर, माळी मॅडम, जगदाळे मॅडम, देवकर मॅडम, बच्चे मॅडम .सुरज मोरे, डॉ.श्रीकांत मोरे. अर्चना पाटील मॅडम. पत्रकार सुनिल पाटील.विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते
सूत्रसंचालन गोरड सर यांनी केले, तर मुख्याध्यापक दत्तात्रय आसगावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमातून समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
Discussion about this post