प्रतिनिधी नाशिक:-
दिडोंरी तालुक्यातील ननाशी येथे आज दि. (१) रोजी सकाळी दहा ते पावणे दहा वाजेच्या सुमारास ननाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा शेजारील पाण्याच्या टाकी समोर ननाशी बाऱ्हे रोड लगत ही निर्घृण हत्या करण्यात आली.
गुलाब रामचंद्र वाघमारे (३७) रा.ननाशी असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून आरोपी सुरेश बोके (४०) व विशाल बोके (२२) या पिता पुत्रांनी कोयता व कु-हाडीने गुलाब याचे शिर छाटुन घटनास्थळा पासुन नजिकच असलेल्या ननाशी औटपोस्ट पोलीस चौकीत मुंडके घेऊन आरोपी हत्यारांसह हजर झाले.
ननाशी येथे शेजारी शेजारी राहणारे हे दोन्ही कुटुंब मात्र यांच्यात काही पूर्ववैमनस्यातून भांडणे होत असत त्या भांडणांचे रूपांतर आज हत्येत झाले या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.
पेठ पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान ननाशी गावात तणावाचे वातावरण असुन एसआरपी च्या पुरूष महिला तुकड्या व पेठ, दिडोंरी, बा-हे, हरसुल, वणीचे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असुन ननाशी गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
Discussion about this post