प्रतिनिधी:-
आज शुक्रवार दिनांक 3/1/2025 रोजी जि. प.शाळा वरने ता.कर्जत जि.रायगड येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी जिजाऊ फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ पुजाताई सुर्वे सौ कांचनताई देशमुख सौ सुवर्णाताई सुर्वे अंगणवाडी शिक्षिका सौ छायाताई देशमुख सेवा सहयोग संस्थेच्या शिक्षिका सौ प्रतिक्षाताई देशमुख तसेच वरने गावातील वाडीतील महिला व तिघर गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सौ पुजाताई सुर्वे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ छाया जाधव मॅडम यांनी केले सर्व मान्यवरांचे स्वागत सौ शेवंता सांबरी मॅडम यांनी केले . वरने शाळेच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त भाषणे केली .
कु संस्कृती देशमुख हिने जोतिबा फुले यांची भूमिकेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंग कथन केले . कु. नंदिता यादव हिने सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारून त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली सौ छाया जाधव मॅडम यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य सांगितले तसेच पुजाताई सुर्वे आमच्या शाळेत दरवर्षी बालिका दिन उत्साहात साजरा करतात मुलांच्या विविध स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस देतात त्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळते त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले मुलांच्या प्रगतीसाठी पुजाताई नेहमीच प्रयत्नशील असतात यापुढेही त्यांनी असेच सहकार्य करावे ही अपेक्षा जाधव मॅडम यांनी व्यक्त केली तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ पुजाताई सुर्वे यांनी मार्गदर्शन पर भाषण केले या मुलांमधूनच भावी जोतिबा फुले व भावी सावित्रीबाई फुले तयार होतील यांना समाजसेवेची आवड निर्माण करणे त्यांच्या वर चांगले संस्कार करणे ही आपण सर्वांची जबाबदारी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले त्यानंतर सौ सांबरी मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले नंतर सर्व उपस्थितांना सौ पुजाताई सुर्वे यांच्या तर्फे खाऊ देऊन कार्यक्रमाचा शेवट गोड करण्यात आला.
Discussion about this post