आयुष्य म्हणजे कधी ना कधी संपणारा प्रवास…२०२४ चांगले का वाईट हा लेखाजोखा मांडता येईना अशी मनाची चंचल अवस्था…अर्थात आपण ते कसे ठरवणार नाही का? पण एव्हढं मात्र नक्की या वर्षात स्वतःसह खऱ्या खोट्या माणसांची ओळख मात्र झाली…
कर्तृत्वशून्य गतिरोधकांचा अभ्यास करायला मिळाला…जे गेलं त्या वर्षाबद्दल फार काय बोलायचे म्हणा? आपण फक्त त्या चांगल्या वाईट आठवांच्या ऋणात राहायचं इतकीचं काय ती जुन्या वर्षाची कमाई…**पण २०२५ मात्र आपल्या “अफलातून” कामानं गाजवायचं…धुमधडाक्यात धडाकेबाज अशी कामगिरी करून “आपली माणसं” जपायची…
“चिमणी पाखरांच्या” “सोबती” “७२ मैल प्रवास” करायचा आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी “झुंज”द्यायची…जीवनाचा आणि जगण्याचा “मुंबई-पुणे-मुंबई” प्रवास करताना समाज “शाळा ” शिकवतो आपण मात्र”जिद्द”सोडायची नाही…जीवनाची “सत्वपरीक्षा” देताना “घात- प्रतिघात”करणारी माणसे “एक दोन तीन चार” भेटतील “दुनियादारी “शिकवतील आपण.
मात्र “संघर्षयोद्धा”म्हणून “खतरनाक” कामगिरी करायची…आयुष्याची “लाइफलाईन”तुमची “गंमत जंमत” करताना अनेकदा प्रश्न विचारेल आता “वाजवू का”…? मग आपण लढाई करण्यासाठी “लाठी” काढायची आपल्या विजयाचा “रंगोत्सव” साजरा करण्यासाठी “जुनं ते सोनं ” समजून “मोगरा फुलला” असं आयुष्य “गोदावरी” सारखं खळखळ वाहतं जगायचं..**आपल्या कामाचं “वेड” सोबतीला घेऊन विजयाचा “धुरळा” उडवायचा…
जीवनाचा “बिनधास्त” आनंद घेताना आपण माणूस म्हणून जगतोय यासाठी स्वतःला “नशीबवान” समजायचं…समाजाने आपल्याला अडकविण्यासाठी “पिंजरा” निर्माण केलेला असतो तेव्हा धीर सोडून “सैराट” व्हायचं नाही,आपण त्याच्यासोबत “टाईमपास” करायचा आणि योग्य वेळ पाहून “एक डाव धोबीपछाढ” करायचा…मग “लयं भारी” “किल्ला”लढवला म्हणून “जिलबी” वाटायची…
जे समाजासाठी “जोगवा”मागतात आणि प्रत्येक वेळी “पराभूत” होऊन सुद्धा “अजिंक्य”राहतात त्यांची “जयंती” साजरी केली जाते…या जीवनाच्या प्रवासात “आयत्या घरात घरोबा” करणारी”एकापेक्षा एक” “चंगू-मंगू” माणसे भेटतात जी तुमच्या चांगल्या कामाची देखील वाईट पद्धतीने “सगळीकडे बोंबाबोंब” करतात… तेव्हा “बाप रे बाप”म्हणून खचायचे नाही तर “आमच्यासारखे आम्हीच” हे दाखवून द्यायचं…
“गुपचूप गुपचूप” “फेकाफेकी” न करता “दे दणा दण” म्हणत आयुष्याला गाजवायचं…नवनवीन “आयडियाची कल्पना” तुम्हाला “धांगडधिंगा” करायची संधी निर्माण करून देते तेव्हा मात्र “खबरदार” कारण,जीवनाचे “रणांगण” गाजवत असताना “एकटा जीव”सदाशिव असतो…!**लेखक.संदीप(भाऊजी)कुडचीकर*.
Discussion about this post