प्रतिनिधी: मुरली राठोड, आर्णी
मो. 9307493402
आर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने 2 जानेवारी 2025 ते 8 जानेवारी 2025 दरम्यान रेझिंग डे सप्ताह साजरा केला जात आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून 3 जानेवारी 2025 रोजी ठाणेदार श्री. केशव ठाकरे यांनी शहीद भगतसिंग विद्यालय, आर्णी येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा घेतली.
कार्यशाळेतील विषय:
- सायबर गुन्हे: विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन.
- बाल संरक्षण कायदा (POCSO): 2012 च्या कायद्यातील मुलांच्या संरक्षणासाठीच्या तरतुदींचे स्पष्टीकरण.
- महिला सुरक्षितता: महिला सबंधित गुन्हे, महिला दक्षता समिती, समुपदेशन कक्ष, भरोसा सेल यांची माहिती.
- वाहतूक सुरक्षा: रस्ता सुरक्षा, वाहतूक चिन्हांची ओळख व मोटार वाहन कायद्यासंदर्भातील नियम.
- अल्पवयीन मुलांचे संरक्षण: अल्पवयीन मुलांच्या पळून जाण्याचे परिणाम व त्यावरील उपाययोजना.
पोलीस स्टेशन दौरा:
नगर परिषद कन्या शाळा, आर्णीच्या विद्यार्थिनींना पोलीस स्टेशनला बोलावून, त्यांना विभागाचे दैनंदिन कामकाज, वायरलेस प्रणाली, गुन्हे अभिलेख कक्ष, महिला व पुरुष कोठडी याबाबत माहिती दिली. तसेच विविध अग्निशस्त्रांची ओळख करून देण्यात आली.
उपस्थित मान्यवर:
कार्यक्रमात शहीद भगतसिंग विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद गायके, पंकज काटकर, संतोष गोदलावर, दयासागर मुदगुलवार, नरेंद्र काकडे, वनिता कासार, मोनिका गोदलावर, तसेच नगर परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद निलावर आणि मजुशा निर्मलवार यांनी विशेष सहकार्य केले.
पोलीस दलाचा सहभाग:
कार्यक्रमाचे नेतृत्व ठाणेदार श्री. केशव ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर पोलीस स्टेशन आर्णीतील सर्व अधिकारी व कर्मचारी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला.
Discussion about this post