
३ कोटी ६८ लाख रुपयांच्या विकास कामांचे संजय रायमुलकर यांच्या हस्ते लोकार्पण,भूमिपूजन मेहकर, विठ्ठलवाडी, चिंचाळा या आदिवासी भागातील गावांमधील ३कोटी ६८ रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण
लोणार /मेहकर ता प्र :-सुनिल वर्मा
३ कोटी ६८ लाख रुपयांच्या विकास कामांचे संजय रायमुलकर यांच्या हस्ते लोकार्पण,भूमिपूजन मेहकर, विठ्ठलवाडी, चिंचाळा या आदिवासी भागातील गावांमधील ३कोटी ६८ रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते पार पडले.राज्यात महायुतीची भरभक्कम सत्ता असल्याने आणि ग्रामीण भागासाठी महत्वाच्या असलेल्या खात्यांचे मंत्री शिवसेनेचे असल्याने यापुढेही मोठ्या प्रमाणावर विकास कामे आपण मेहकर मतदारसंघात आणणार असल्याची माहिती रायमुलकर यांनी आपल्या भाषणातून दिली. संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या जनुना येथील वाघामाय मंदिरासमोरील एक कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य सामाजिक सभागृहाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. २० रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांच्याच प्रयत्नातून २८ लाख रुपयांच्या तलाठी भवनाचे काम अंतिम टप्प्यात असून बांधकामाची त्यांनी पाहणी केली.सत्कार समारंभात सरपंच अर्चनाताई तिवाले, सुनील फुके , संजय सूनकेवार ,रमेश फुके , गुणमाला अंभोरे , बाळू चव्हाण यांनी संजय रायमुलकर व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला.राजेंद्र पळसकर,दिलीपराव देशमुख यांची यावेळी भाषणे झाली.गजानन चनेवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.आदिवासी गावांना जोडणारे कोट्यावधी रुपये किमतीचे रस्ते तयार करण्यात आले असून भविष्यातही मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे मंजूर करून आणणार असल्याची माहिती रायमुलकर यांनी आपल्या भाषणातून दिली.भजनी मंडळीला साहित्य खरेदीसाठी त्यांनी आर्थिक मदत प्रदान केली. राजगड येथील १ कोटी ६० लाख रुपये किंमतीच्या पाझर तलावाचे भूमिपूजन संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. विठ्ठलवाडी येथे विठ्ठल रुखमायी मंदिराजवळील २० लाख रूपयांच्या पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ १० लाखांच्या सभामंडपाचे भूमिपूजन रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले.भागवत वानखेडे, धनराज जाधव , ज्ञानेश्वर वानखेडे, मोतीचंद राठोड,सुरेश आडे , गजानन राठोड , शिवराम राठोड, साहेबराव शेवाळे, परशुराम जाधव ,शाम राठोड, प्रेमदास जाधव, संजय शेवाळे, गणेश आडे, रविंद्र सुर्वे, रमेश खोडके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. चिंचाळा येथे २० लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन आणि २० लाखांच्या २ शाळा खोल्यांचे लोकार्पण संजय रायमुलकर यांच्या हस्ते झाले. गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराला उत्तर देतांना रायमुलकर म्हणाले की, गावात मोठ्या प्रमाणावर घरकुले उभारण्यात आली असून जागा उपलब्ध करून दिल्यास आणखी घरकुले देण्यात येतील.आदिवासी भवन बांधण्याची मागणीही पूर्ण करून दिली जाईल.केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भरीव कामे करण्याची संधी मिळाली.मेहकर लोणार तालुक्यात अजूनही ३ हजार कोटींची कामे मंजूर आहेत,ती सुरू करण्यात येतील.येत्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत भरीव सहकार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी वासुदेव खुळे, भगवान वानखेडे, गजानन चनेवार, मनोज वानखेडे, विशाल तिवाले, राजाराम मीराशे, महादेव इमारे ,भगवान डाखोरे, सुमनताई जामकर, नंदाताई मिरासे,अनुसया झळके ,गजानन करवते, प्रकाश जामकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. स्थानिक भजनी मंडळाला साहित्य खरेदीसाठी रायमुलकर यांनी आर्थिक मदत प्रदान केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव जामकर यांनी केले.महानुभाव मठ येथे भेट देऊन आदिवासी आश्रम शाळेची रायमुलकर यांनी पाहणी केली. **********

Discussion about this post