लोहा तालुक्यातील शेवडी बाजीराव येथिल
सुका कचरा साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक घरी प्लास्टिक बॅग चे वाटप….
*माझी शेवडी स्वच्छ शेवडी सुंदर शेवडी आज हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला…
तर सविस्तर बातमी पाहू
ग्रामपंचायत शेवडी बाजीराव तालुका लोहा जि. नांदेड व कमल उद वाडिया फाउंडेशन कार्पे संस्था छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आपले गाव स्वच्छ व सुंदर गाव बनवण्यासाठी माझी शेवडी सुंदर शेवडी स्वच्छ शेवडी हे अभियान राबविण्यात आले आहे या अभियानांतर्गत आपल्या गावात अभियाना अंतर्गत आपल्या गावांमधील *सुका कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडीची सुरुवात करण्यात येत आहे.
जसे की कागद प्लास्टिक पुड्या,चप्पल, बूट ,खराब झालेली कपडे असा कचरा कुजत नाही व तो जाळल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम होतो त्याकरिता आज दिनांक 04 जानेवारी 2025 शनिवार आपल्या गावामध्ये सुका कचरा साठवून ठेवण्यासाठी प्रत्येक घराला प्लास्टिक बॅग चे वाटप करण्यात आले व दिनांक 9 जानेवारी 2025 गुरुवार रोजी पासून दर गुरुवारी सुका कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी येणार आहे तरी आपले सहकार्य मिळावे अशी अपेक्षा ग्राम पंचायत कार्यालया कडून कऱण्यात आली आहे
तरी हे अभियान यशस्वी करण्यात यावे यासाठी
शेवडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत शेवडी बाजीराव आणि कमल उद वाडिया फाउंडेशन कार्पे संस्था छत्रपती संभाजी नगर* कऱण्यात आले आहेः
या अभियानात प्रमूख उपस्थिती माजी सरपंच श्री कैलासराव धोंडे सरपंच बसवेश्वर धोंडे उपसरपंच दत्तात्रय यजगे ग्रामपंचायत सदस्य संगमेश्वर चपटे पुंडलिक इदुलवड मारोती वत्ते कारपो प्रतिनिधि मल्हारी पंडित मधुकर एनकफळे दिगंबर राईकवाडे सह सर्व ग्रामपंचायत सदस्य सह गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती लाभली..


Discussion about this post