वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे.
वैजापूर तालुक्यात चोरांचा धुमाकूळ सुरू आहे.
वैजापूर मध्ये अनेक ठिकाणी चोरी झाली, परंतु पोलिसांना चोर पकडण्यात अपयश आले आहे.
त्यामुळे चोरांचे चोरी करण्याचे धाडस वैजापूर तालुक्यात वाढले आहे.
दि.३ जानेवारी (शुक्रवार) रोजी शिऊर गावामध्ये एकाच रात्री चोरांनी चार ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे.
शिऊर गावामध्ये शुक्रवार रात्री
चोर चोरी करण्याचे उद्देशाने आले होते. त्यांनी घरामध्ये झाडाझडती केली परंतु त्यांना त्या घरामध्ये काहीही सापडले नाही. म्हणून त्यांनी शेजारी असलेल्या, श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स सराफ या दुकान चे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु आतील बाजूस लोखंडी चैनल चा दरवाजा असल्यामुळे चोरांचा तेथे डाव असफल झाला.
नंतर त्यांनी निलेश देशमुख, मनोज मुळे, अशोक संघवी, नंदू देशमुख यांच्या घरात घुसून कपाटांची झडती घेतली, परंतु त्यांना कोणताही मुद्देमाल त्यांना सापडला नाही.
पहाटेच्या सुमारास निलेश देशमुख यांच्या निदर्शनास आले की घरामध्ये चोरी झाली आहे.
त्यांनी तात्काळ चोरीची घटना पोलिसांना दिली, चोरीची माहिती मिळताच पोलिसांनीही तात्काळ धाव घेतली. व घटनेचा पंचनामा करून एकाच रात्री चार ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न चोरांनी केला.
त्यामुळे शिऊर गावांमध्ये ग्रामस्थांना भीतीचे वातावरण तयार झाले.
त्यामुळे ग्रामस्थांची शिऊर पोलीस यांना लवकरात लवकर चोरांचा तपास लावून त्यांना अटक करावी. व ग्रामस्थांना भीतीमय करावे.
असे ग्रामस्थांचे पोलिसांना विनंती केली आहे.
त्यामुळे शिऊर पोलिसांनीही ग्रामस्थांना दिलासा दिला की लवकरात लवकर चोरांना ताब्यात घेण्यात येईल.
त्यामुळे पुढील तपास शिऊर पोलीस करत आहे.
Discussion about this post