प्रतिनिधी:- सुमित डव्हाळे
शेतात गेलेल्या १९ वर्षीय युवकाचा पाय घसरून विहिरीत पडल्यामुळे मृत्यू झाल्याची दुदैवी घटना मोताळा तालुक्यातील ब्राम्हंदा येथे काल रविवार ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव सौरव उर्फ वैभव शिंदे असे आहे.
मोताळा तालुक्यातील धा. बढे पोस्टे. अंतर्गत असलेल्या ब्राम्हंदा येथील सौरभ उर्फ वैभव ईश्वर शिंदे (वय १९) हा युवक ४ जानेवारी रोजी शेतात गेला होता. तो दुपारी १२ दरम्यान शेतात काम करीत असताना दिसला होता. मात्र तो घरी परत आला नसल्याने त्याचा दिवसभर शोध घेतला असता तो आढळून आला नाही. त्याचा मृतदेह काल रविवार ५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच्या शेतातील विहिरीमध्ये सौरभने नेलेल्या जेवणाच्या डब्याची थैली तरंगताना आढळून
आली.
ज्ञानेश्वर बाबुराव शिंदे यांच्या फिर्यादीवरुन धा. बढे पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ. सुरेश सोनवणे करीत आहे.
Discussion about this post