दिनांक:- 05/01/2025
24 वर्षांनी पुन्हा एकत्र आले 2000-2001 साली शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आठणींना पुन्हा उजाळा मिळाला कार्यक्रमास 166 मुलं व मुली उपस्थित होते
निमित्त होते बारामती शहरातील श्री छत्रपती शाहू हायस्कूल व जुनिअर कॉलेज च्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे
2000 – 2001 साली दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच श्री छत्रपती शाहू हायस्कूल बारामती या ठिकाणी पार पडले.
दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सध्याचे शाळेचे प्राचार्य श्री गणपत तावरे सर उपस्थित होते त्याचबरोबर व्हि बी शिंदे, के बी जाधव, एम जी शिंदे, टी एस जरांडे, डी एन घाडगे, व्ही जी जाधव, दुधाने सर, गावडे सर, साठे सर, मोमीन सर, शिरकांडे सर, के डी पवार, मांडके सर, एस एस जगदाळे, पवार मॅडम, शिरकांडे मॅडम आधी शिक्षक उपस्थित होते,
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेतल्या गमती जमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला व एकमेकांना सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली.
शाळेतल्या खोल्या व खोल्यातील बाकडी आणि शेजारी बसणारे मित्र मैत्रिणी यांची आठवण प्रत्येकाच्या मनात घर करून असते शाळा सोडल्यानंतर पुन्हा वर्गात बसण्याची इच्छा वारंवार मनात येत असते, म्हणून अशा स्नेह मेळाव्याचे आयोजन प्रत्येक वर्षी करावे अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली,
काही मित्र व मैत्रिणी दूरचा प्रवास करून या मेळाव्यास उपस्थित राहिले होते
उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तहसीलदार, ए पी आय, डॉक्टर इंजिनीयर, शिक्षक, वकील, पोलीस, इत्यादी पदावर कार्यरत आहेत
शिक्षक व विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधले,
आलेल्या सर्व मित्र मैत्रिणींचे फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
सुप्रिया काळे, नीता शिंदे, अबोली माने, मोनिका कांबळे, निलेश बागाव, व्यंकटेश शिंदे, अभिषेक गायकवाड, निलेश जेधे, सुजय कांबळे, सोमनाथ लोंढे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
शाळेल्स भेट म्हणून 12 सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले
भारतीय संविधानाचे ७५ वे वर्ष म्हणजेच भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने अमोल खरात यांचे वतीने संविधान उद्देशिका भेट देण्यात आली
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संदीप जाधव, निलेश कांबळे, चंद्रकांत इंदलकर, कैलास गावडे, अमित जरांडे, प्रवीण पवार, अभिजीत निगडे, अभिषेक गायकवाड, गणेश गायकवाड, महेश रंदावणे, अंबादास गावडे, चंद्रकांत यादव, विनोद डोंबाळे, अण्णा काळे जमीर इनामदार यांनी प्रयत्न केले.
सूत्रसंचालन रेश्मा शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक तबरेज सय्यद यांनी केले तर रूपाली बारवकर यांनी आभार मानले.
Discussion about this post