आज जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे सर्व विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सुधारत अद्ययावत करण्याच्या सूचना केल्या, केंद्र व राज्य सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्यात यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. ऊर्जा विभागाच्या वतीने दक्षता बाळगत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशा सूचना दिल्या. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी वाडी वस्ती तांड्यावर देखील मुबलक पाण्याची व्यवस्था व्हावी या दृष्टीने योग्य पावले उचलण्याचे संबंधित विभागास निर्देश दिले.
परभणी जिल्ह्यात आरोग्य वीजपुरवठा, पाणीप्रश्न या संदर्भात आलेल्या तक्रारींचे तातडीने *निराकरण करून नागरिकांना सर्व सुविधा सुलभतेने पुरवाव्यात यासाठी सर्व विभागांनी दक्ष राहून कार्य करावे यासाठी या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.उपस्थित कलेक्टर मा श्री गावडे सर, एसपी मा श्री परदेशी साहेब, सि ओ मॅडम व सर्व विभाग
Discussion about this post