बंडखोर प्रमुख नेते सोडून इतर कार्यकर्त्यांशी संवाद साधून कार्यकर्त्यांचा व उबाठा गटाचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश करून घेणार…. भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे
नेवासा प्रतिनिधी:
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष यांच्या मदतीने नेवासा तालुक्यातील आमदार बदलण्याचे काम प्रामाणिकपणे कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले नुकताच कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा आभार सोहळा पार पडला त्यानंतर आज नेवासा शहर येथे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप सदस्य नोंदणी अभियानांतर्गत आज एक बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान उपस्थित प्रश्नांमध्ये कार्यकर्त्यांनी आपले मत व्यक्त केले की तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते आहे की त्यांनी काही कारणांमुळे बंडखोरी करून बंडखोर नेत्याचे काम केले,
त्यांची केलेली चूक आता त्यांच्या लक्षात आले असून इथून पुढे ते कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत काम करण्यासाठी इच्छुक आहे असा प्रस्ताव बैठकीत मानण्यात आला यावर सविस्तर सर्व पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊन चर्चा अंती भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश शेटे बोलताना म्हणाले की, आपण बंडखोर प्रमुख नेते सोडून इतर सर्व सामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, व उबाठा गटाचे कार्यकर्त्यांचा लवकरच भारतीय जनता पार्टी समावेश करून घेणार व भारतीय जनता पार्टी पक्ष तालुक्यात सक्षम करणार व कार्यकर्त्यांना च्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारअसल्याचे यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केले.
आणि लवकरच काही वाट चुकलेले फक्त कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीचा मेळावा घेऊन भारतीय जनता पक्ष मजबूत करून त्यांना पक्षांमध्ये अधिकृत सामावून घेऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था , तालुक्यातील सर्व ग्रामपंचातीत, नगरपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टी,व महायुतीचा झेंडा पूर्ण ताकतीने कसा फडकेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी बोलताना व्यक्त केले. यासाठी लवकरच तालुका भर सदस्य नोंदणी अभियान राबवणार असल्याचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी बोलताना म्हणाले की आपल्याला सर्व तालुका वर सर्व बुथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत सदस्य नोंदणी अभियान व विरोधी गटात काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचे लवकरच प्रवेश होणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. यापुढे कुठल्याही भारतीय जनता पार्टी महायुतीच्या कार्यकर्त्याला कुणाकडूनही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल व पक्ष मजबूत व पक्ष वाढीसाठी गाव स्तरावर भारतीय जनता पार्टीच्या शाखा स्थापना ही लवकरच तालुका भर करण्यात येईल. बैठकीदरम्यान अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आलेल्या अडचणी आणि काहींकडून झालेल्या चुका देखील बैठकीत कबूल केले यापुढे सर्व एकजुटीने एक विश्वासाने काम करूया आणि भारतीय जनता पार्टी पक्ष मजबूत करूया यासाठी सर्वानुमते बैठकीत निर्णय करण्यात आला.
लवकरच नेवासा भारतीय जनता पार्टीची नूतन नवीन कार्यकारणीची ही घोषणा होणार असल्याचेही युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी यावेळी बोलताना सांगितले, याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष रोहित पवार व्यापारी सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मुथा, शहर उपाध्यक्ष शंकर कंनगरे, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ, नगरसेवक इंजिनीयर सुनीलजी वाघ,शिवसेनेचे शहराध्यक्ष बंडू शिंदे, भाजप प्रसिद्धीप्रमुख आदिनाथ पटारे, सचिन भांड,अनिल परदेशी, निखिल जोशी, बाळासाहेब शिरसागर ,विवेक ननवरे, महेश लोखंडे, प्रतीक शेजुळ, आकाश देशमुख, नाना शेंडे, गोरक्षनाथ बेहले, आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post